छत्रपति कार्यकाळ १७०७-१७४९
'लोकराजा'
महामानवांचं कार्यकर्तृत्व आणि व्यक्तीत्व हे बिरुदं, पदव्या किंवा उपाध्यांमध्ये सामावणारं नसतं, तथापि काही बिरुदं, पदव्या नि उपाध्या ह्या लोकभावनेचा उत्कट आविष्कार असतात. 'लोकराजा' ही जनतेने शाहू महाराजांना बहाल केलेली उपाधी अशीच आहे. लोकराजा म्हटलं की शाहू राजांचं नाव मुखात येतं आणि शाहू राजे म्हटलं की लोकराजा उपाधी जीभेवर येते. इतकं अतूट नातं या दोन शब्दांचं आहे.
छत्रपती शिवरायांच्या गादीचा मान आणि शान शाहू राजे आपण आपल्या प्रागतिक विचारवर्तनाने शतपटीने वाढवला. परिणामी 'कुळवाडीभूषण' शिवरायांच्या शिवकुलाचे आपण कुलभूषणही ठरलात. शिवविचारांचा रथ आपण इतका पुढे नेला की, तो आता कुणालाही मागे खेचता येणार नाही. त्यामुळेच फुले, आंबेडकरांच्या पंगतीत आपलंही मानाचं पान मांडलं गेलं. भारताच्या तीन सिंहाच्या राजमुद्रेसारखीच, पुरोगामी महाराष्ट्राची फुले, शाहू, आंबेडकर ही प्रतिकमुद्रा बनली!
'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' ही वंदनीय पाऊलांची कसोटी तुकोबांनी लोकांच्या हाती देऊन वंदनीय पाऊलांचा शोध सहजसोपा केला. तुकोबांच्या या विजेरीत दृष्टीस पडणा-या वंदनीय पावलात, राजे आपल्या पावलांचं प्रसन्न दर्शन आम्हाला घडतं. त्या पावलात आपली पावलं शोभून दिसतात.
सत्तेच्या नशेत अनेकांची पावल़ं वाकडी पडतात, तर जबाबदारीचं ओझं पेलू न शकल्याने कित्येकांचे पाय पांगळे होतात. आपल्या पावलांनी जबाबदारीचं ओझं नुसतं समर्थपणे पेललंच नाही, तर प्रत्येक क्षेत्रात आपल्या पावलांचे सुंदर ठसे उमटवले.
राजप्रासाद नि राजपथावर शतपावली करणा-या राजांची पावलं जनपथाकडे फिरकतसुद्धा नाहीत. आपल्या पावलांना मात्र राजपथापेक्षा जनपथाचाच जास्त लळा होता. म्हणूनच ती सुयश संपादन करणा-या 'भिमा'च्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी मुंबईच्या झोपडपट्टीकडे वळली. तर अस्पृश्यता निवारणाचं प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी, चहा पिण्याच्या निमित्ताने, गंगाराम कांबळेच्या हॉटेलाकडेही नित्य वळत राहिली. आपल्या पदस्पर्शाने कांबळेचं हॉटेल जणू अस्पृश्यता निवारणाची प्रयोगशाळा बनली.
राजकारणाबरोबर धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, सहकार, कला, निर्माणकार्य, मल्लविद्या, शिकार इत्यादी क्षेत्रात आपल्या पावलांनी केलेला मुक्तसंचार थक्क करणारा आहे. या प्रत्येक क्षेत्रात उमटलेल्या आपल्या पाऊलखुणांनी परिवर्तनाची पाऊलवाट प्रशस्त होऊन तिचं राजमार्गात रुपांतर झालं होतं. पण दुर्दैवाने आज या राजमार्गावर राजकारणी, धर्मकारणी आणि समाजकंटकानी जागोजागी 'टोलनाकी' उभारुन त्या राजमार्गाचा संकोच चालविला आहे. आपल्या राजमार्गावरची ही अतिक्रमणं बघून मन विषण्ण होतं. या विषण्ण मनाला दिलासा देतात आपल्या वंदनीय पाऊलखुणा!
छत्रपति कार्यकाळ १७०७-१७४९
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ,पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे,रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ,सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.
शाहू महाराजांचे नाव असलेल्या संस्था
- शाहू कापड गिरणी, कोल्हापूर
- शाहू कुस्ती मैदान, खासबाग (कोल्हापूर)
- शाहू कॉलेज, पुणे
- शाहू चित्रमंदिर, कोल्हापूर (स्थापना : १५ मे, इ.स. १९४७)
- राजर्षी शाहू जलतरण तलाव, मोहननगर (पिंपरी-पुणे)
- शाहू नगर. जळगाव
- छत्रपती शाहू पुतळा, महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली); संसद प्रांगण (नवी दिल्ली), दसरा चौक (कोल्हापूर)
- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू पुरस्कार
- शाहू भवन, बलिया (बिहार)
- छत्रपति शाहू जी महाराज मेडिकल विश्वविद्यालय, लखनौ (आता या विद्यापीठाचे नाव बदलून किंग जॉर्ज मेडिकल विश्वविद्यालय केले गेले आहे!)
- राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर
- राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
- शाहू मैदान, कोल्हापूर
- राजर्षी शाहू विकास आघाडी, जयसिंगपूर
- छत्रपति शाहू जी महाराज विश्वविद्यालय, कानपूर
- छत्रपति शाहू जी महाराज शोध एवं प्रशिक्षण संस्थान, भागीदारी भवन, गोमती नगर, लखनौ
- राजर्षी शाहू सहकारी बँक
- राजर्षी शाहू महाराज सोशल नॅशनल पुरस्कार
- राजश्री शाहू महाराज स्मारक भवन, कोल्हापूर
- राजर्षी छत्रपती शाहूमहाराज रेल्वे टर्मिनस (अधिकृत हिंदी लघुरूप ’छशाट’) : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव
- लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था, पुणे
- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे
- शाहु ग्लोबल स्कुल (स्वराज्य रयत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,औरंगाबाद.)
(जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स.
१८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur) Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)
* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी विवाह झाला
महाराजांचे शिक्षण - *1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षीनाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
-शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
-कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले
* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
- सहकारी कायदा केला व सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
-कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
-बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
-आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
- 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय विवाहास कायद्याने मान्यता दिली
- कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
- जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
- आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
- गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
- तलाठी शाळा सुरु केल्या.
* 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
- एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या
अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
- शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
* 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
- देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
- हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
- पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
* 6 मे 1922 रोजी मुंबई येथे निधन.
No comments:
Post a Comment